शिवसेना-भाजपच्या भूमिकेनंतर काँग्रेस पुढील दिशा ठरवणार – पृथ्वीराज चव्हाण

644

शिवसेना आणि भाजपला जनतेने बहुमत दिले आहे. ते जबाबदार पक्ष असून त्यांनी जबाबदारीने वागावे, असा सल्ला देत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपाल तसेच शिवसेना-भाजपच्या भूमिकेनंतर काँग्रेस पुढील दिशा ठरवणार असल्याचे स्पष्ट केले. स्व. यशवंतराव मोहिते यांच्या जन्मशताब्दी कार्यगौरव सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

‘राज्य आणि शेतकरी अडचणीत आहे. मात्र शिवसेना आणि भाजप मधला मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यांना जनतेने सत्ता स्थापनेचा कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी जबाबदारीने वागावे. उद्यापर्यंत सरकार स्थापन झाले नाही, तर राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या