
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिल्लीत शनिवारी झालेल्या बैठकीत मांडला, मात्र आव्हानात्मक परिस्थितीत राहुल यांनीच नेतत्व करावे अशी गळ घालत काँग्रेस कार्यसमितीने हा प्रस्ताव फेटाळून लावला. अध्यक्षपद ‘गांधी’ नसलेल्या व्यक्तीला द्यावे असे राहुल यांचे म्हणणे होते. मात्र कार्यकारिणीने ते धुडकावून लावले. तसेच पक्ष संघटनेत आवश्यक बदल करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आल्याची माहिती प्रकक्ते रणदीपसिंह सुरजेकाला यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय काँग्रेस कार्यसमितीची बैठक सोनिया गांधी, मनमोहन सिंग, गुलाम नकी आझाद, ए. के. अँटनी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीत पार पडली. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दर्शविली. बैठक सुरू होताच सदस्यांनी त्यांनी राजीनामा देऊ नये अशी भूमिका घेत त्यांचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला.
कमलनाथ यांची बैठकीकडे पाठ
दिल्लीत झालेल्या या बैठकीस सोनिया गांधी, मनमोहन सिंग, दिल्लीचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एम सिद्धरमय्या आदी उपस्थित होते, मात्र मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.
अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत
देशात जिथे जिथे काँग्रेसला अपयश आले तेथील सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत असे सांगत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. निकालानंतर आज पहिल्यांदाच चव्हाण पत्रकारांना सामोरे गेले. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसला 9 ते 10 जागांचे नुकसान झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.
मनमोहन सिंग यांनी केली मनधरणी
बैठक सुरू होण्यापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि प्रियंका गांधी यांनी राहुल यांची भेट घेतली. किशेषतः मनमोहन यांनी राहुल यांना राजीनाम्याचा आपण किचारच करू नये असे सांगत त्यांची मनधरणी केली. निकडणुकीत हारजीत ही असतेच पण त्यापुढे जाऊन पक्षाला आपल्या नेतृत्काची गरज आहे. आपल्याशिकाय पक्षाकडे दुसरा कोणताही पर्याय नाही असे मनमोहन यांनी सांगितले. इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनाही पराभक पाहाका लागला होता, मात्र त्यांच्याच नेतृत्कात पक्षाला पुन्हा यश आल्याची आठवण करून दिली.






















































