काँग्रेसकडून माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे निलंबन मागे

विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने निलंबित करण्यात आलेले माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे निलंबन काँग्रेसकडून मागे घेण्यात आले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत दिल्लीत हा निर्णय घेण्यात आला. प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राजेंद्र मुळक यांचे पुन्हा पक्षात स्वागत करून निलंबन मागे घेतल्याचे अधिकृतरीत्या आज घोषित केले.