कामगार आंदोलनाला सफाई मजदूर काँग्रेसचा पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात देशभरातील सर्व कामगार संघटनांनी 1 मे अर्थात कामगार दिनी आंदोलन करण्याचे ठरविले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने घेतला आहे.

राष्ट्रवादी सफाई कामगार सेल, मजदूर काँग्रेस आणि बांधकाम जनरल कामगार युनियनची बैठक शनिवारी राष्ट्रीय अध्यक्ष दलितमित्र गोविंद परमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

मोदी सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. मोदी सरकारचे कामगार धोरण कामगारांच्या मुळावर उठणारे असून संपूर्ण कामगार चळवळच मोडीत काढण्याचा डाव असल्याचे परमार यावेळी म्हणाले.

दरम्यान, कामगार संघटना कृती समितीने उद्या चलो राजभवनचा नारा दिला असून मोटरसायकल रॅली काढून कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला जाणार आहे. मोदी सरकारने 44 कामगार कायद्यांचे चार विधेयकांत रूपांतर करून परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी कामगारांना जोखडाला जुंपल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.