डोळे आलेल्या रुग्णांची संख्या तीन दिवसांत एक लाखाने वाढली

yoga-for-eyes
1>> डोळ्यांना हाताने ऊब द्या! मांडी घालून जरा शांत बसा. डोळे बंद ठेवा. काही वेळानंतर हाताचे तळवे एकमेकांवर घासून त्याची ऊब डोळ्यांना द्या. दिवसातून कितीही वेळा ही क्रिया तुम्ही करु शकता. तुम्हाला नक्की फ्रेश वाटेल.

राज्यात डोळे येण्याची साथ झपाटय़ाने पसरत असून या आजाराच्या रुग्णांची संख्या गेल्या तीन दिवसांत एक हजाराने वाढली आहे. मुंबईतील रुग्णांचा आकडाही तीन हजारांवर पोहोचला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत 3 लाख 57 हजार 265 रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त 44,398 रुग्ण बुलढाणा जिह्यात आहेत. त्यानंतर पुणे 28,043, जळगाव 22,417, नांदेड 18,996, चंद्रपूर 15,348, अमरावती 14,738, परभणी 14,614, अकोला 13,787, धुळे 13,273, वर्धा 11,303, नंदुरबार 10,294, भंडारा 10,054 या जिह्यांमध्ये रुग्णांचा आकडा दहा ते वीस हजारांच्या वर पोहोचला आहे. मुंबईत रुग्णांचा आकडा 2862 झाला असून पुण्यात 6720, नाशिक 5575 तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 4643 रुग्णांची नोंद झाली आहे.

हा आजार होऊ नये म्हणून वारंवार हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे, डोळय़ांना हात न लावून या आजाराला प्रतिबंध करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.