धक्कादायक…कॉन्स्टेबलने दीड वर्षाच्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर सिगारेटने दिले चटके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका पोलीस कॉन्स्टेबलने दीड वर्षांच्या चिमुरडीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सिगारेटचे चटके दिले आहेत. या वेदनेमुळे चिमुरडीने याबाबत आईला सांगितल्कयावर तिच्या आईने बालोद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

कॉन्स्टेबल अविनाश राय बालोद पोलीस ठाण्यात आरक्षक पदावर कार्यरत होता. तसेच सिवनी गावातील एका घरात भाड्याने राहत होता. त्याची नुकतीच दुर्ग जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. कॉन्स्टेबल सिवनीमध्ये ज्यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होता. त्यांच्या दीड वर्षांच्या मुलीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर त्याने सिगारटेचे चटके दिले आहेत. त्याने हे कृत्य का केले याची माहिती मिळालेली नाही.

मुलीने याबाबत आईने सांगितल्यवर तिच्या आईने बालोद पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबलविरोधात तक्रार दिली. त्याची दखल घेत पोलिसांनी कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अविनाश राय आपल्या घरी आला. आपल्याशी थोडा वेळ बोलल्यावर तो घरातच थांबला होता. त्यानंतर अचनाक त्याने मुलीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर तो फरार झाला, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी फरार कॉन्स्टेबलचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याची बदली झालेल्या दुर्ग जिल्ह्यातही त्याचा शोध घेण्यात आला. अखेर त्याला भिलाईमधून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला बालोदला आणून त्याची चौकशी करण्यात येत आहे. त्याने असा क्रूरपणा का केला याची माहिती घेण्यात येत आहे. रायची दुर्गला बदली झाल्याने या प्रकरणी दुर्ग पोलीस अधीक्षकांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.