बोरघाटात कंटेनर कारवर कोसळला; तीन ठार, सहा वाहने चिरडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर आज भीषण अपघात झाला. बोर घाटात सकाळी 10 वाजता एका कंटेनरने सहा वाहनांना जोरदार धडक दिली. यानंतर कंटेनर एका कारवर कोसळला. या भीषण अपघातात इनोव्हा कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी आहेत. अपघातामुळे बोरघाटातील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.

चालक अवधेश यादव हा पंटेनर घेऊन पुण्याहून मुंबईकडे जात होता. तो बोर घाटातील खोपोली एक्झिटजवळ आला असता पंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील एका कारला जोरदार धडक दिली. यानंतर आणखी चार वाहनांना धडक देत पंटेनर पुढे जाऊन इनोव्हा कारवर आदळला. या अपघातात इनोव्हा कारमधील श्रीकांत जाधव, अंबादास पेटारे, प्रमोद पवार (सर्व रा. पुणे) या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.