
औद्योगिक वसाहतीत मजूर पुरवठ्याच्या गुत्तेदारीतील वर्चस्वावरून बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील संजय अंभोरे यांचा 4 महिन्यांपूर्वी शेलगाव येथे गावठी पिस्तूलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणातील शूटर असलेला राजसिंग उर्फ कुलदीपसिंग शामसिंग कलानी याला मध्य प्रदेशमधून अटक करण्यात आली आहे. खून झाला तेव्हापासून तो फरार होता. या गुन्ह्यातील कलानी वगळता सर्व आरोपींना पोलिसांनी याआधीच जेरबंद केले होते.
दरम्यान, याप्रकरणातील सर्व आरोपीविरुद्ध मागील महिन्यात मोक्का लावण्यात आल्यामुळे गुन्ह्याचा तपास भोकरदनचे डीवायएसपी सुनील जायभाये यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. फरार राजसिंग उर्फ कुलदीपसिंग शामसिंग कलानी यास बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेश राज्यातील मानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुर्दी गावातून त्यास अटक केली आहे. ही कारवाई कारवाई पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, डीवायएसपी सुनिल जायभाये, गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पठाण, नापोकाँ. जगदीश बावणे, पोकाँ. गणेश पायघन, सागर देवकर, स्थागुशाचे सोमनाथ उबाळे, रवी जाधव यांच्या पथकाने केली.
























































