
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ सोमवारी (दि. 12) सकाळी विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात एकूण 17 हजार 191 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. याचबरोबर 50 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी, तर 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
कुलगुरू डॉ. फडणकीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱया या समारंभास मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुहास पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. सोमवारी सकाळी प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत मिरवणूक निघणार आहे. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी असणार आहेत. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, मानवविज्ञान विद्याशाखा, आंतर विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी देऊन सन्मानित करण्यात येईल.
या पत्रकार परिषदेस प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेकार, कुलसचिक योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर, सीए श्रेणी व शाह, पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, सहायक कुलसचिक डॉ. शिवाजी शिंदे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉ. अंबादास भासके आदी उपस्थित होते.
मार्च 2022ला उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे पदकी प्रमाणपत्र संबंधित महाविद्यालयात दीक्षांत सोहळा पार पडल्यानंतर मिळेल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी सांगितले. दीक्षांत सोहळ्याच्या यशस्वितेसाठी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. सध्या या समित्यांचे काम सुरू आहे.
50 विद्यार्थ्यांना पीएच.डी.
याकर्षी 50 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदकी प्रदान केली जाणार आहे. पीएच.डी. प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 37 मुले, तर 13 मुलींचा समावेश आहे. त्याचबरोबर यंदा 57 किद्यार्थी सुकर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. यंदा नवीन चार सुवर्णपदकांची काढ झालेली आहे. विविध विषयांत गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना देणगीदारांनी दिलेल्या रकमेतून सुकर्णपदक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातो. अशा एकूण 57 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये तब्बल 32 मुली, तर 25 मुलांचा समावेश आहे.




























































