कुकचा प्रामाणिकपणा, पैशांनी भरलेली बॅग परत केली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अलिबागमधील एका प्रतिष्ठीत व्यक्तीची सर्व प्रकारची कार्ड, महागडा फोन आणि पैशांनी भरलेली बॅग हॉटल सुरुचीमध्ये कुक म्हणून काम करणारा दिपक सुबराव घोटणे याला सापडली. त्याने ही बॅग प्रमाणिकपणे परत केली. एव्हढेच नव्हे तर बक्षीस म्हणून देऊ केलेली रक्कम देखील त्याने घेतली नाही.

काही प्रतिष्ठीत व्यक्ती रविवारी प्रवास करून गाडीतून अलिबागला परत येत होते. त्यांची गाडी रात्री हॉटेल निलीमा जवळ काही व्यक्तींना उतरण्यासाठी थांबली. त्यावेळी त्यातील एका व्यक्तीची बॅग रस्त्यात पडली. घरी गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपली बॅग हरवली आहे, ज्यात सर्व कार्ड, फोन, पैसे आहेत. गाडी जेथे थांबली होती तेथे शोधण्यासाठी हे लोक परत आले. परंतु तेथे बॅग सापडली नाही. म्हणून त्यांनी बॅगमधील फोनवर संपर्क साधाला. दिपक घोटणे याने तो उचलाला. तुमची बॅग माझ्याकडे आहे. तुम्ही मेघा टॉकीजकडे या असे त्याने सांगितले. ही प्रतिष्ठीत व्यक्ती तेथे गेली. दिपकने त्यांची बॅग प्रमाणिपणे परत केली.

या व्यक्तीने बॅग उघडून पाहिली तर त्यातील सर्व वस्तू व्यवस्थीत होत्या. सर्व पैसे होते. त्यामुळे या व्यक्तीचा जीव भांड्यात पडला. दिपकच्या प्रमाणिकपणाबद्दल त्याला ही प्रतिष्ठीत व्यक्ती बक्षीस म्हणून पैसे देत होती. परंतु त्याने ती नाकारली. दिपकने दाखविलेल्या प्रामाणकीपणाबद्दल त्याचे कौतुक होत आहे.