‘कॉपी’चा विषय आता रूपेरी पडद्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षण क्षेत्रात स्वतःच्या हिमतीवर आणि केलेल्या अभ्यासावर यशस्वी व्हायचे असते. पण काही जण कॉपीचा सहारा घेऊन झटपट यश मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. शिक्षणक्षेत्रातील कॉपीसारख्या विषयावर बेतलेला ‘कॉपी’ हा मराठी सिनेमा लवकरच दाखल होतोय. अनेक सिनेमहोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरलेल्या या सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले. निर्माते गणेश पाटील यांनी ‘श्री महालक्ष्मी क्रिएशन्स’च्या बॅनरखाली तयार केलेल्या, तसेच विवेक पंडित यांच्या ‘वंदे मातरम फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या या सिनेमात शिक्षण व्यवस्थेकर आणि शिक्षण क्षेत्रातील कारभारावर दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे या दिग्दर्शक द्वयीने प्रकाश टाकला आहे. 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात मिलिंद शिंदे, अंशुमन विचारे आणि जगन्नाथ निवंगुणे यांनी खेडय़ातील शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या तिघांच्या जोडीला कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, नीता दोंदे, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर, पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत, अदनेश मदुशिंगरकर, प्रतीक लाड, रोहित सोनाकणे, प्रतीक्षा साबळे, शिवाजी पाटणे, सिकंदर मुलानी, आरती पाठक आणि विद्या भागवत आदी कलाकारांनी या चित्रपटात विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.