कोरोनामुळे मुदतकर्ज देणाऱया 78 टक्के वित्तीय संस्था बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील उद्योग, संस्था यावर गंभीर परिणाम झाला असून वित्तीय उदासीनता आणि महसूल निर्मिती होत नसल्यामुळे देशातील मुदतकर्ज देणाऱया 78 टक्के वित्तीय संस्था (एमएसएमई) बंद कराव्या लागल्या आहेत. डेटा विश्लेषणावर आधारित बँकिंग आणि वित्तीय सेवा पंपनी ‘स्पोक्टो’ने केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.

स्पोक्टोने ‘द ग्राउंड टथ ः व्हॉइस ऑफ इंडियन बॉरोव्हर्स’ या विषयाखाली मुदत कर्ज देणाऱया संस्थांचा अभ्यास केला. ग्राहकांची गरज, जागरूकता, मोरॅटोरियमची समज आणि देय रकमेवर त्याचा परिणाम या अभ्यासातून दिसला. मुंबई, पुणे, नवी दिल्ली, बंगळुरू इत्यादीसारख्या 185 शहरांमधील खातेदारांचे विचार व दृष्टिकोनांचा यात अभ्यास करण्यात आला. सुमारे 59 टक्के ग्राहकांचे कोरोनामुळे पूर्णपणे नुकसान झाले आहे तर केवळ 4 टक्के ग्राहकांच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही. 34 टक्के कामगरांनी नोकऱया गमावल्या आहेत. दरम्यान, दैनंदिन गरजा भागवण्याकरिता सुमारे 56 टक्के लोकांनी वैयक्तिक कर्ज घेतले आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या