संभाजीनगरात कोरोनाचा दुसरा बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार पॉझिटिव्ह रुग्णांपैकी घाटी रुग्णालयात उपचार घेत असलेले आरिफ कॉलनीतील 68 वर्षीय रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. या वृद्धाच्या मृत्यूने कोरोनामुळे झालेल्या बळींची संख्या आता दोन झाली आहे.

या वृद्धाचा लाळेचे नमुना 8 एप्रिल रोजी घेण्यात आला होता. तो 9 रोजी निगेटिव्ह आला. त्यानंतर 24 तासांच्या अंतराने 11 एप्रिल रोजी या रुग्णाच्या लाळेचा नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवला असता तो काल सोमवार, 13 रोजी पॉझिटिव्ह आला होता. या रुग्णाला ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे अशी लक्षणे दिसत असऱ्याने आणि त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. हे वृद्ध पुणे येथून आलेल्या आयटीतील तरुणाचे वडील होते. या मृत्यूने आता संभाजीनागरातील कोरोनाबधितांच्या मृत्यूचा एकदा 2 वर पोहचला आहे. यापूर्वी सातारा येथील मुंबईतील बँकेच्या व्यवस्थापकाचा मृत्यू झाला होता.