कोरोनाचा कहर सुरूच, अमरावतीची हजाराकडे वाटचाल

489

सोमवारी सकाळच्या अहवालात 31 कोरोना बाधित रुग्ण आल्याने अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 945 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे अमरावतीकर नागरिक जिल्हा प्रशासनासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा कहर हा सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात 100 रुग्णाची भर झाली आहे हे विशेष आज आलेल्या रुग्णामध्ये 10 महिला तर 21 पुरुष कोरोना बाधित आढळून आले आहेत. आज आलेल्या अहवालात अतुल नगर, श्रीराम नगर, एल आय सी कॉलनी, गाडगेनगर, लालखाडी, संजय गांधी नगर, शेगाव नाका, हनुमान नगर, प्रियंका कॉलनी, छत्रसालनगर, गुरुकृपा कॉलनी, भारत नगर, सिद्धार्त नगर, वडाळी, वल्लभ नगर सराफा लाईन अंबा कॉलनी, यशोदा नगर, बिचू टेकडी, मांगीलाल प्लॉट, माधव नगर सोबत ग्रामीण भागातील मोर्शी, भातकुली, वलगाव, दर्यापूर, अंजनगाव सूर्जी येथील रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांवर कोविड -19 रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. कोरोनाचा कहर असाच वाढत राहिला तर अमरावती जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तविला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या