लज्जास्पद! भाजप नेत्यांनी भर उन्हात लहान मुलांना आंदोलनात उतरवले, आदित्य ठाकरे यांचे भाजपवर ताशेरे

कोरोना विरोधातील युद्धात सरकार, प्रशासन, डॉक्टर, पोलीस सर्व एकसंघपणे लढत असताना भाजपकडून आंदोलनाचे राजकारण केले जात आहे. या लज्जास्पद राजकारणाचा शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी समाचार घेतला.

आंदोलनासाठी लहान मुलांचा वापर केला जात असल्याचा फोटो ट्विट करून आदित्य ठाकरे यांनी ‘सत्तेच्या लालसेपोटी नेते लहान मुलांना उन्हात उभं करू शकतात, राजकारण इतके प्रिय झालं की कोरोनालाही विसरले’ अशा शब्दात भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपनं ‘माझं अंगण रणांगण’ आंदोलन सुरू केलं. या आंदोलनातील एक फोटो पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केला. या फोटोत लहान मुले हातात भाजपचा झेंडा घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. ‘हे अगदीच लज्जास्पद आहे. सत्तेच्या लालसेपोटी नेते काय करू शकतात. लहान मुलांना तळपत्या उन्हात उभं करण्यात आलं आहे. त्यांच्या तोंडावरील मास्क पूर्णपणे खाली सरकले आहेत. आज या मुलांना सुरक्षित आणि घरातच ठेवण्याची गरज असताना राजकीय आंदोलन करताना त्यांचे चेहरेही व्यवस्थित झाकलेले नाहीत. कोरोनाला विसरून गेले, कारण राजकारण प्रिय आहे’ अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपवर ताशेरे ओढले

आपली प्रतिक्रिया द्या