
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील सामान्य जनजीवन बाधित केलेले असून मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्ताना सामाजिक बांधिलकी व मानवतेच्या दृष्टिकोनातून बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार माननीय मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत करण्यासाठी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने तसेच बँकेच्या सर्व सेवकांनी एक दिवसाचा पगार असा एकूण रुपये 25 लाखाचा धनादेश मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व बँकेचे संचालक रावसाहेब शेळके यांच्या हस्ते नगर जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था दिग्विजय आहेर यांच्याकडे सोपवला. या वेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे,जनसंपर्क अधिकारी भारत सोलेपाटील हे उपस्थित होते.































































