
कोरोनाच्या काढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधाचा परिणाम दुधाच्या मागणीवर झालेला असतानाच आता खरेदी दरातही मोठी घसरण झाली आहे. दुधाच्या मागणीत घट झाल्याने दूध डेअरींनी शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या प्रतिलिटर दुधाच्या दरात 3 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता प्रतिलिटरला 30 रुपयांऐवजी 27 रुपये मिळणार आहेत. पहिल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच मागील वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर राज्यासह देशभरात दुधाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याने 20-22 रुपये प्रतिलिटर दराने मिळणाऱ्या दूध दर 30 रुपयांपर्यंत वाढला होता. मात्र आता पुन्हा राज्यात लॉकडाऊनचे वारे वाहू लागल्याने त्याचा परिणाम दुधाच्या मागणीवर झाला आहे.

























































