सुट्टीत पर्यटनाला जाताय? थांबा! पुन्हा लॉकडाऊनचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाखो नागरिकांचे जीव घेणारा कोरोना हिंदुस्थानातून अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सुट्टय़ांच्या काळात देशभरात पर्यटनाला जाण्याचा मोह टाळा, अन्यथा कोरोनाच्या तिसऱया लाटेला आमंत्रण द्याल, असा गंभीर इशारा हिंदुस्थानी चिकित्सा अनुसंधान परिषदेच्या (आयसीएमआर) संशोधकांनी देशवासीयांना दिला आहे. सुट्टीच्या काळात कोरोना प्रतिबंधाकडे दुर्लक्ष केले तर कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका 103 टक्क्यांनी आणि कोरोना संसर्गाचे मामले 43 टक्क्यांनी वाढू शकतात, अशी भीती आयसीएमआरचे संशोधक बलराम भार्गव यांनी बोलून दाखवली आहे. लंडनच्या इम्पीरियल कॉलेजच्या संशोधकांनीही आयसीएमआरच्या इशाऱयाला दुजोरा दिला आहे.