मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून रमजान ईदनिमित्त शुभेच्छा

रमजान नियम पालन, संयम आणि परस्परांप्रती प्रेम, आदरभाव यांची शिकवण देणारा असा सण असतो. यातून मिळालेल्या ऊर्जेतून प्रेरणा घेऊ आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी प्रयत्न करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पवित्र अशा रमजान महिन्याची सांगता अर्थात ईद-उल-फित्र (रमजान ईद) च्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, नियमांचे काटेकोर पालन करून सर्वांना आरोग्य मिळेल अशी काळजी घेऊया. ईदचा उत्साह-उत्सव सुख-समृद्धी आणि आरोग्यदायी संपन्नता घेऊन यावा ही प्रार्थना. मुस्लिम बांधवांना रमजान ईदनिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा.

आपली प्रतिक्रिया द्या