
कुंभमेळा पार पडलेल्या हरिद्वारसह उत्तराखंडमधील चार शहरांमध्ये कोरोना कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील आणि राज्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून, हरिद्वार, रुर्की, लक्सर, भगवानपूर या शहरांत बुधवारी सायंकाळी 5 वाजेपासून कोरोना कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. 3 मेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी या संचारबंदीची घोषणा केली. हरिद्वारबरोबरच रुर्की, लक्सर, भगवानपूरमध्येही बुधवारपासून (28 एप्रिल) कोरोना कर्फ्यू लागू केला जाणार आहे.

























































