कोरोनाच्या संदर्भात खोटा प्रचार, ‘या’ आमदाराला अटक

आसाममध्ये ‘क्वारंटाइन सेंटर्स’ची स्थिती ‘डिटेंशन सेंटर’हून वाईट आहे आणि हे मुस्लिमांविरोधात रचलेले षडयंत्र आहे, अशी खोटी माहिती देणारी क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी ऑल इंडिया डेमॉक्रॅटिक यूनायटेड फ्रंटचे ( AIUDF) आमदार अमीनुल इस्लाम यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसामचे पोलीस महासंचालक महंत यांनी दिलेल्या माहिती नुसार, अमीनुल इस्लाम यांची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. राज्यातील क्वारंटाइन सेंटर्सची स्थिती डिटेंशन सेंटरहून वाईट आहे आणि हे मुस्लिमांविरोधात रचलेले षडयंत्र आहे, असे वक्तव्य ते या क्लिपमध्ये करतान दिसत आहेत. त्याच्याविरोधात भादंविच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. या बरोबरच आसाम विधानसभा अध्यक्षांना याबाबत कल्पना देण्यात आली आहे.’ दरम्यान, आरोपी अमीनुल यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.’

‘क्लिपमध्ये ऐकू येत असलेला आवाज आपलाच असून ही क्लिप आपणच तयार केली आहे’, अशी कबुली अमीनुल यांनी चौकशीदरम्यान दिल्याचे नौगावचे पोलीस अधीक्षक गौरव अभिजीत दिलीप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच अमीनुल यांच्या फोन मध्ये ही क्लिप आढळली असून फोन जप्त करण्यात आला आहे.

अमीनुल इस्लाम हे ढिंग या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांना प्राथमिक चौकशीनंत अटक करण्यात आली आले.

आपली प्रतिक्रिया द्या