कोरोनाच्या जगभरातील महत्त्वाच्या देशाच्या आकडेवारीवर एक नजर

1207

युरोपमध्ये इटली व स्पेनमध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. इटलीत मृतांची संख्या 17 हजारांहून अधिक झालाी आहे. तर, स्पेनमध्ये 13 हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. जर्मनीत एक लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, 1900 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. हिंदुस्थानात 5194 जण कोरोनाग्रस्त आहेत.

जगभरात 13 लाख 94 हजारांहून अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे 79 हजारजणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत तीन लाख 80 हजारांहून अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. फ्रान्समध्ये सुमारे एक लाखजणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर इस्त्राएलमध्ये ९ हजारांहून अधिकजणांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, बराच काळ कोरोनाचा एकही रुग्ण नसलेल्या न्यूझीलंडमध्ये काही दिवसांत 1100 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या