संचारबंदीत विविध ठिकाणी भटकंती केल्यामुळे 100 वाहने जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे शहरात संचारबंदी असतानाही किरकोळ कामासह विनाकारण फिरणाऱ्या तब्बल 200 जणांना स्वारगेट पोलिसांनी गुरुवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यापैकी 70 हुन अधिक जणांनी संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच 100 हून अधिक वाहने जप्त करण्यात आली.

शहरामध्ये संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडण्यास मनाई आहे. याबाबत शहरातील विविध पोलीस ठाण्यांकडून व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. असे असूनही अनेक नागरिक विनाकारण आणि किरकोळ कामासाठी फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर पोलिसांकडून गुरुवारी सकाळपासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मध्यवर्ती भागात जाण्यासाठी किंवा किंवा शहराच्या दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी स्वारगेट येथील जेधे चौकातून पुढे जावे लागते. त्यादृष्टीने स्वारगेट पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून चौकातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडविण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांच्याकडे बाहेर फिरण्याचे कारण विचारल्यानंतर त्यांच्याकडून किरकोळ प्रकारची कामे करण्यासाठी बाहेर पडल्याचे कारण सांगितले. पोलिसांनी तब्बल 200 पेक्षा लोकांना अडविले होते. त्यापैकी पोलिसांकडून अधिकृत परवानगी घेतलेले व व अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडणाऱ्या व्यक्ती वगळता सत्तरहून अधिक जणांविरुद्ध याप्रकरणी संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.