
कोरोनाची लागण झाली तर चहा प्या, असा अजब सल्ला उत्तर कोरियाच्या नागरिकांना देण्यात आला आहे. उत्तर कोरियामध्ये ओमायक्रॉनची साथ सुरू झाली असून कोरोनाची लस न घेतल्यामुळे संक्रमण वेगाने होत आहे.
याच महिन्यात किम जोंग उन यांनाही कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या आधी किम जोंग उन यांनी कोरोनाचा फैलाव न झाल्याचा आणि नंतर कोरोनासाठी क्वारंटाईनचे नियम कडक केल्याचा दावा केला होता.
आता कोरियाने कोरोनाच्या लागणीवर घरगुती उपाय करण्यास सांगितलं आहे. यात चहा पिण्यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्यात मध, आलं अशांसारखे घटक घालून गंभीर पातळीवरचे रुग्ण बरे करावेत, असाही सल्ला देण्यात आला आहे.
ज्यांना खूपच निकड असेल त्यांनी प्रतिजैविके घ्यावीत असा सल्ला देण्यात आला आहे.


























































