कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस, नोक्का रोबोटिक्स कंपनीची निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णांना आर्द्रतायुक्त ऑक्सिजन देऊन त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त असे हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी उपकरण पुण्यातील नोक्का रोबोटिक्स कंपनीने बाजारात आणले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सध्या हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइसची प्रचंड गरज भागवते. एचएफओटी (हाय-फ्लो ऑक्सिजन थेरपी डिव्हाइस) नेजल कॅनुलाद्वारे रुग्णांना आर्द्रतायुक्त ऑक्सिजनची हवा देते. त्यामुळे रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. थेरपीमध्ये कफ बाहेर काढणे सोपे होते. या उपकरणात सर्वसमावेशक हिटर आणि दोन तापमान सेंसर्सदेखील आहेत. त्यामुळे याचा वापर मुले आणि ज्येष्ठ अशा दोघांसाठीही याचा वापर केला जाऊ शकते. ‘हे उपकरण श्वसनाशी संबंधीत तीव्र आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांना जास्तीत जास्त आराम देते, अशी माहिती नोक्का रोबोटिक्सचे सीईओ निखिल कुरेले यांनी दिली.