#corona पाकिस्तानात 900 जणांना कोरोनाची लागण, देशांतर्गत रेल्वे सेवा बंद

1976

कोरोना व्हायरस आता हळूहळू एकेका देशामध्ये पसरून हाहाकार माजवू लागला आहे. पाकिस्तानमध्येही या विषाणूने दहशत माजवली असून तिथे 900 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या आहेत.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढत आहे. मंगळवारपर्यंत पाकिस्तानमध्ये 900 जणांना बाधा झाल्याचं वृत्त आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने देशांतर्गत सर्व रेल्वे सेवा पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे.

दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी लॉकडाऊन करण्याविषयी असमर्थता दर्शवली आहे. पाकिस्तानची 25 जनता ही द्रारिद्र्य रेषेखालील आहे. जर लॉकडाऊन झालं तर या जनतेचे हाल होतील, असं म्हणत इम्रान खान यांनी लॉकडाऊन करण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानी नागरिकांनी स्वतःच घरी राहून सर्व व्यवहार बंद ठेवावेत असं आवाहन खान यांनी केलं होतं. अखेर पाकिस्तानमधील प्रांतपातळीवरील प्रशासनांनी लॉकडाऊन जाहीर केलं आहे. आतापर्यंत सिंध आणि पंजाब सरकारने लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या