
अमरावती जिल्ह्यातील शनिवार आणि रविवारी आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्या बघता जिल्ह्यात रुग्णांचा टक्का घसरल्याचे दिसून येत आहे. शनिवारी दिवसभर्यात 6 नवे कोरोनाचे रुग्ण आढळुन आले होते. तर रविवारी त्यात 4 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 279 झाली आहे.
काही दिवसाचा आढावा घेतला असता अमरावतीत सरासरी 8 ते 10 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. कधी-कधी हा आकडा 18 रुग्णांपर्यंत पोहोचला होता. आता मात्र शनिवार आणि रविवारी एकुण 10 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रविवारी सकाळी आलेल्या अहवालात जयस्तंभ चौक येथील 8 वर्षीय बालक, प्रभुद्ध नगर येथील 40 वर्षीय पुरुष, यशोनगर येथील 18 वर्षीय युवती आणि विलास नगर येथील 57 पुरुषांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. शनिवारी आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या अहवालात रुग्णांचा टक्का खाली आल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाने आतापर्यंत 5 हजार 368 नमूने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी 4 हजार 920 नमूने निगेटिव्ह आले. सध्या प्रकृतीत सुधार झालेल्या रुग्णांची संख्या 172 असून मृत्यू झालेल्यांची संख्या 16 आहे. सध्या 91 रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी 83 रुग्ण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल असून दोघांवर नागपूरमध्ये उपचार सुरु आहेत.

























































