बीड जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक रूग्ण; कोरोनाबाधितांची संख्या 30 वर

761
corona-new

बीड जिल्ह्यातील 42 जणांचे नमुने 21 मे रोजी तपासणीसाठी घेण्यात आले होते. तपासणीचा अहवाल शनिवारी आला असून 35 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आहे. तर एकजण कोरोनाबाधित असून 6 जणांच्या नमुन्यांचा निघालेला नाही. आता बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या 30 वर पोहोचली आहे.

आठवडाभरात बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढले आहेत. बीड जिल्ह्यातून 42 जणांचे स्वॅब 21 मे रोजी तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 35 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एकजण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनाबाधित असलेला रूग्ण आष्टी तालुक्यातील धनगरवाडी येथील आहे. तो मुंबईहून गावी परतला होता. एका तरूणाचा गुरूवारी रात्री मृत्यू झाला होता. त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आणख एक रुग्ण आढळल्याने बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या