
मुंबईत गेल्या 24 तासांत 722 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजार 689 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंतच्या 489 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या एका दिवसांत केलेल्या 652 कोरोना चाचण्या आणि काही प्रलंबित पॉझिटिव्ह चाचणी अहवालांसह ही आकडेवारी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. 27 मृतांमध्ये 21 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. मृतांमध्ये 11 पुरुष आणि 16 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, एकाच दिवसांत 203 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त होणार्यांची संख्या 2792 वर पोहोचली आहे.




























































