
गेल्या काही दिवसांत सातत्याने कोरोन रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. 4 महिन्यांच्या तुलनेत सर्वात कमी रुग्ण गेल्या 24 तासात आढळले आहेत.
गेल्या 24 तासात देशात 30 हजार 548 रुग्ण सापडले आहेत. 15 जुलैपासून हा आकडा सर्वाधिक कमी आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 88 लाख 45 हजार 127 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 43 हजार 851 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 82लाख 49 हजार 579 वर पोहोचली आहे. देशात सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणे 93.26 टक्के इतके आहे.
गेल्या काही दिवसांत सातत्याने कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी होत आहे, तसेच कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. देशात सध्या 4 लाख 65 हजार 478 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या हे अवघी 5.26 टक्के इतकी आहे.
गेल्या 24 तासात कोरोनामुळे 435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 30 हजार 70 वर पोहोचला आहे. देशात सध्या मृत्यू दर हा 1.47 इतका आहे.
























































