कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय; राज्यात 6 हजार 159 नवीन रुग्ण, 4 हजार 844 कोरोनामुक्त

महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून सर्वतोपरी काळजी घेतली जात असतानाच बुधवारी राज्यात 6 हजार 159 नवे करोना रुग्ण आढळले आहेत तर 4 हजार 844 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 92.64 टक्के इतके झाले असून सध्या राज्यात 84 हजार 464 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण 16 लाख 63 हजार 723 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. मागील 24 तासांमध्ये 65 मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूदर 2.60 टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 4 लाख 56 हजार 962 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17 लाख 95 हजार 959 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 29 हजार 344 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 6 हजार 980 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मुंबईत दिवसभरात 1,144 कोरोना रुग्ण

मुंबईत बुधवारी दिवसभरात 1,144 रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 701 जण कोरोनामुक्त झाले. मात्र, विविध शारीरिक आजार असलेल्या 17 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

 मुंबईत 17 जणांचा मृत्यू झाल्याने एपूण मृतांची संख्या आता 10 हजार 723 झाली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 53 हजार 604वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 206 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 11 हजार 101 इतकी आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 18 लाख  17 हजार 232 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 2 लाख 78 हजार 590 वर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या