
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले. मात्र त्यानंतरही जिह्या- जिह्यातील बाजारपेठांत होणारी गर्दी आणि त्यामुळे गावागावांना पडणारा कोरोनाचा वेढा यामुळे आता जिह्यांत कडक लॉकडाऊनची अंमलबजाणी सुरू झाली आहे. जिल्हा पातळीवर लॉकडाऊन करण्याचे निर्णय घेतले जात असून नाशिक, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, वाशिम, सातारा, सोलापूर आणि वर्धा या जिह्यांत कडक लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. जिल्हाधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याबाबत निर्णय घेत आहेत.
अमरावती/यवतमाळ – रविवारपासून 15 मेपर्यंत
वर्धा – 8 मे ते 13 मे
वाशिम – रविवारपासून 15 मेपर्यंत
सातारा – लॉकडाऊन पाच दिवस वाढवला.
सोलापूर – 15 मेपर्यंत कडकडीत बंद
बीड – 12 मेपर्यंत लॉकडाऊन वाढला.
बदलापूर – 15 मेपर्यंत कडकडीत
रत्नागिरी/सिंधुदुर्ग -15 मेपर्यंत सिंधुदुर्गात लॉकडाऊन लावण्यात आला असून रत्नागिरीचीही लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.
कोल्हापूर – जिल्हय़ातील वाढती रुग्णसंख्या पाहता दोन दिवसांत कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असे पालकमंत्र्यांनी सांगितले.






























































