कोरोनामुक्त व्यक्तीला पुन्हा त्याची लागण होत नाही

910

एकदा कोरोना झालेल्या व्यक्तीला तो पुन्हा होऊ शकतो का, या प्रश्नाचे उत्तर अजूनही ठामपणे देता आले नसले तरी वैज्ञानिकांच्या मते एकदा कोरोनाची लागण झाल्यानंतर पुन्हा त्याचा संसर्ग त्या रुग्णाला होत नाही.अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या शरीरात या विषाणूला विरोध करणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाला त्याची लागण पुन्हा होत नाही.अर्थात या रुग्णाच्या शरीरातील अँटीबॉडीजचा प्रभाव किती काळ टिकतो यावर संशोधक अजून बारकाईने संशोधन करीत आहेत.

मुंबईत कोरोनाची साथ आटोक्यात, चहल सिंग यांचा दावा

आपली प्रतिक्रिया द्या