मुंबईत कोरोनाची साथ आटोक्यात! इकबालसिंह चहल यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत रुग्ण वाढीचा सरासरी वेग हा 1 टक्क्याच्या खाली म्हणजे 0.97 टक्के इतका आला असून जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांप्रमाणे मुंबईत कोरोनाची साथ आता आटोक्यात आली आहे, असे म्हणता येईल, असा दावा मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई पालिका आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना आणि राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे मुंबईत मुंबईत कोरोनाची साथ आटोक्यात येईल, असा विश्वास पालिका आयुक्त चहल यांनी 15 जुलैला बोलून दाखवला होता. मुंबईत सुरुवातीला एका कोरोना रुग्णापासून 9 व्यक्तींना संसर्ग होत होता. मात्र, आता हे प्रमाण झपाट्याने कमी झाले असून आता एका रुग्णापासून केवळ 0.97 टक्के अशी लागण होत आहे. देशात रुग्णवाढीचा दर हा 22 टक्के असताना मुंबईत मात्र रुग्ण वाढीचा दर हा 72 टक्के इतका प्रचंड आहे. चाचण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढवत नेऊनही रुग्ण संख्या मात्र कमी होत आहे. अशा प्रकारे कोरोनावर नियंत्रण मिळवणारी देशातील ही पहिलीच महानगरपालिका आहे, असे आयुक्त चहल म्हणाले.