हिंगोलीत कोरोनाचा एक संशयित रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल

2667

हिंगोली  जिल्ह्यात कोरोना आजाराच्या एका संशयीत रुग्णास हिंगोली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वार्डामध्ये दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना उपचार आयसोलेशन वॉर्डात दाखल झालेला संशयित रुग्ण डॉक्टर असून त्यांचे वय 30 वर्ष आहे. हा रुग्ण शासकीय स्त्री रुग्णालय, अकोला येथे कार्यरत असून सध्या हिंगोलीत वास्तव्याला आहे. या संशयिताला 24 मार्चपासून सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसून आल्याने आय.सी.एम.आर. च्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांचा थ्रोट स्वॅब पुणे येथील एन.आय.व्ही. संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये त्यांच्या अहवाल येणे अपेक्षीत असून, सदरील संशयीत रुग्णावर जिल्हा सामान्य रुग्णालय, हिंगोली येथील तज्ञ डॉक्टरांच्या पथकामार्फत औषधोपचार करण्यात येत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या