
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांसह पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी आणखी शहरातील २१ भाग सील केले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता घराबाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक मदतीसाठी नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्ष १०० यावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी सील केलेला परिसर
१) प्रायव्हेट रोड पत्राचाळ, लेन १ ते ४८ तसेच परिसर आणि ताडीवाला रोड प्रभाग-२०
२) संपूर्ण ताडीवाला रोड
३) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रीवास्तवनगर प्रभाग -२
४) राजेवाडी, पडमजी पोलीस चौकी, जुना मोटार स्टँड, संत कबीर, कॅम्प चौक, क्वाटर गेट,भवानी पेठ प्रभाग -२०
५) विकासनगर वानवडी गाव
६)लुम्बिनीनगर, ताडीवला रोड
७) चिंतामणीनगर हंडेवाडी रोड प्रभाग क्रमांक २६ ते २८
८) घोरपडी गाव , बी.टी. कवडे रोड
९) संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर जवाहरलाल नगर, येरवडा प्रभाग- ८
१०) पर्वती दर्शन परिसर
११) सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट पुणे-मुंबई रस्ता ते भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, रेल्वे रूळ डावी बाजू व उजव्या बाजूस नरवीर तानाजीवाडी चौक ते जुने शिवाजीनगर एस टी स्टँड, पटेल टाईल्स, विक्रम टाईल्स, इराणी वस्ती सर्व्हे क्र-११ मज्जीदचा भागाचा परिसर ते रेल्वे भुयारी मार्ग न ता. वाडी, मनपा शाळा क्रमांक- ४७ परिसर दोन्ही बाजू
१२) संपूर्ण पाटील इस्टेट परिसर प्रभाग- १४
१३) संपूर्ण भोसलेवाडी परिसर व वॉकडेवाडी परिसर प्रभाग -७
१४ ) निंब रोड कोंढवा प्रभाग-२६
१५) संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर
१६) साईनगर कोंढवा प्रभाग २७
१७) संपूर्ण विमाननगर प्रभाग ३
१८)वडगावशेरी परिसर प्रभाग ५
१९) धानोरा प्रभाग एक
२०) येरवडा प्रभाग 6
२१) संपूर्ण कोंढवा बुद्रुक परिसर




























































