
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1,230 नवीन रूग्णांची नोंद झाली असून 587 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 36 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 23,401 वर पोहोचला असून एकूण 868 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 4,786 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना ‘ही’ बाब दिलासादायक, आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती
राज्य सरकारने जिल्हा आणि मनपानिहाय आकडेवारी जाहीर केली आहे. वाचा तुमच्या जिल्ह्यातील काय आहे सध्या कोरोनाची परिस्थिती…
































































