मुंबईत आणखी 1430 जणांनाकोरोना, 38 जणांचा मृत्यू!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून आज नवीन 1430 रुग्णांची नोंद झाली. यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 31 हजार 789 वर पोहोचली आहे. शिवाय गेल्या एकाच दिवसांत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांचा एकूण आकडाही 1026 झाली आहे.

मुंबईत गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्या 38 रुग्णांमध्ये 26 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. यातील 27 जणांना दीर्घकालीन आजार होते. तर 15 जणांचे वय 60 वर्षांहून जास्त होते. शिवाय 20 रुग्णांचे वय 40 ते 60 वर्षांदरम्यान आणि दोन रुग्णांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होते. दरम्यान, मुंबईत गेल्या एकाच दिवसात 330 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे मुंबईतील एकूण कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या आता 8404 वर झाली आहे.

एकूण मृतांमध्ये 63 टक्के पुरुष

मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्या एकूण 1026 रुग्णांमध्ये 63 टक्के पुरुष आणि 37 टक्के महिलांचा समावेश आहे. तर एकूण रुग्णांमध्ये पुरुष 60 टक्के आणि महिला 40 टक्के आहेत. एकूण मृत्यूंमध्ये 67 टक्के रुग्णांना मधुमेह, रक्तदाब असे दीर्घकालीन इतरही आजार होते. याशिवाय आतापर्यंत 463 मृतांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते, तर 456 मृतांचे वय हे 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.