कोरोनाच्या काळात महाराष्ट्र विविध आघाड्यांवर लढत आहे. एकाबाजूला कोरोनाची विद्ध्वंसक दुसरी लाट आणि दुसऱ्या बाजूला लसीकरणाचं लक्ष्य अशा स्थितीतही महाराष्ट्राने लसीकरणाचा वेग चांगला राखला आहे. तसेच देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग अधिक आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच बुधवारपर्यंतचा लसीकरणाचा आकडा जाहीर केला आहे.
महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 13 लाख 52 हजार 332 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. असे राजेश टोपे यांच्या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे. तसेच दि.26 मे 2021 रोजी 1,34,577 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी माहितीही त्यांनी दिली.
महाराष्ट्रात कालपर्यंत 2 कोटी 13 लाख 52 हजार 332 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.26 मे 2021 रोजी 1,34,577 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.#MahaVaccination pic.twitter.com/mhlwESof75
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 27, 2021































































