कोरोना लसीकरण पूर्ण होण्यास दोन वर्षे लागणार, सामान्यांपर्यंत लस पोहोचवण्याचे आव्हान

कोरोनावरील लसीला मंजुरी मिळाल्यानंतर ही लस तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन जगासमोर आहे. विविध देशांतील मिळून सुमारे 7 अब्ज लोकसंख्येपर्यंत लसीचा डोस पोहोचवणे सोपे नसून हे आवाहन पेलण्यासाठी 110 टन क्षमता असलेल्या विमानाच्या 8 हजार फेऱया लसीच्या वाहतुकीसाठी कराव्या लागणार आहेत. तसेच हे मिशन पूर्ण होण्यासाठी 2 वर्षाचा काळ लागणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

कोरोनावरील लसीच्या वाहतूकीसाठी केवळ विमानच नव्हे तर कार, बस, ट्रक, मोटारसायकल, सायकलची मदतही घ्यावी लागणार आहे. काही भागात तर पायी प्रवास करूनच लस पोहोचवावी लागणार आहे.  तसेच तयार झालेली लस 6 महिन्यांपर्यत सुरक्षित ठेवण्यासाठी – 70 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असणार आहे.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार जगातील सर्वात मोठी कार्गे सर्व्हीस असलेल्या लुफ्थांसाने एप्रिलमध्येच लसीच्या वाहतूकीची योजना आखली होती. त्यानुसाल 20 लोकांचा एक टास्क फोर्स तयार करण्यात आला असून मॉडर्ना, फायझर, एस्ट्राजेनेकाची लस जगाच्या कानाकोपऱयात पोहोचवण्याचे काम करता येईल, असे टास्क फोर्सचे प्रमुख थॉर्टन ब्रॉन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या