कोरोना लशीवर काम करणाऱ्याया टीमशी मोदींची तीन दिवसांत दुसऱ्यांदा चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लसीवर काम करणाऱया देशातील विविध शास्त्रज्ञांच्या टीमसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसांत दुसऱयांदा चर्चा केली आहे. या चर्चेत देशातील सामान्य नागरिकांना लशीच्या परिणामांची माहिती देण्याबरोबरच लसीची वाहतूक, लाँजिस्टीक, कोल्ड चेन याविषयी पंतप्रधानांनी संवाद साधला.

सोमवारी व्हिडीओ काँन्फरंसिंगद्वारे मोंदींनी जेनोवा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डीज यांच्या टीमशी चर्चा केली. या चर्चेवेळी पंतप्रधानांनी लस निर्मिती करणाऱया कंपन्यांकडून सूचना मागविल्या आहेत. लसीसाठी आवश्यक मंजुऱया, अन्य कायदेशीर बाबींविषयी पंतप्रधांनांनी सूचना करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, मोदींनी लस निर्मितीशी निगडीत सर्व विभागांना लस निर्मिती करणाऱया कंपन्यांच्या बरोबरीने काम करण्याच्या तसेच त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.