घाटी रूग्णालयात तीन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू

392

संभाजीनगर शहरात गेल्या 24 तासांत तीन पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता शहरातील कोरोना बळींची संख्या 95 वर पोहोचली आहे. शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) शहरातील नेहरू नगर, कटकट गेट येथे राहणाऱ्या 30 वर्षीय गरोदर कोरोनाबाधित महिलेचा 4 जून रोजी दुपारी 2 वाजता मृत्यू झाला. दुसरा मृत्यू रेहेमानिया कॉलनी येथील 34 वर्षीय पॉझिटिव्ह महिला रुग्णाचा झाला. या महिलेस 1 जून रोजी घाटीत भरती करण्यात आले होते. तिचा आज पहाटे 2 वाजता मृत्यु झाला.

आजचा तिसरा मृत्यू तक्षशीला नगर येथील 48 वर्षीय पॉझिटिव्ह पुरुष रुग्णाचा झाला. या रुग्णास 2 जून रोजी घरात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज दुपारी 1.30 वाजता त्याचा मृत्यु झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 74, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 20 मिनी घाटीमध्ये 1 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 95 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या