#Corona नगर जिल्ह्यात आणखी 12 रूग्णांची वाढ, 6 जणांना डिस्चार्ज

510

नगर जिल्ह्यात आज आणखी 12 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर 73 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तसेच आज 6 व्यक्ती बरे होऊन घरी गेले आहेत.

गुरुवारी प्राप्त अहवालानुसार, नगर शहरातील वाघ गल्ली येथील 42 वर्षीय महिला, 45 वर्षीय आणि 50 वर्षीय पुरुष तसेच 18 वर्षे वयाचा तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच सुपा (पारनेर) येथील 56 वर्षीय महिला, चंदनपुर (राहाता) येथील 24 वर्षीय युवक ल, संगमनेर शहरातील मोमीनपुरा भागातील 46 वर्षीय पुरुष आणि नाईकवाडपुरा भागातील 50 वर्षीय महिला, श्रीरामपूर येथील 52 वर्षीय पुरुष, श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वडगांव येथील 76 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. यासह ठाणे येथील 40 वर्षीय पुरुष (मूळचा पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथील असून मुंबई पोलीस दलात कार्यरत), कळवा (मुंबई) येथील 40 वर्षीय पुरुष (मूळचा दरेवाडी (नगर) येथील असून मुंबई पोलिस दलात कार्यरत) यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

6 जणांना डिस्चार्ज
आज नगर जिल्ह्यातील 6 जण कोरोनातुन बरे होऊन घरी गेले आहेत. या रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 260 इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापुसाहेब गाढे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या