नदालची अमेरिकन ओपनमधून माघार ,कोरोनाची परिस्थिती व वेळापत्रकावर नाराज

493

कोरानाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले अपयश आणि टेनिसचे वेळापत्रक यावर नाराजी व्यक्त करीत दिग्गज टेनिसपटू रफाएल नदाल याने 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अमेरिकन ओपन या ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेमधून माघार घेतली आहे.

जगातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात नाही. कोरोनाबाधीतांची संख्या वाढतच चाललीय. त्यामुळे अमेरिकन स्पर्धेत खेळायचे की नाही याबाबत खूप विचार केला. अखेर माझ्या हदयाचे ऐकले व या स्पर्धेमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला, असे रफाएल नदाल यावेळी म्हणाला.

31 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर या कालावधीत अमेरिकन ओपन स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. तसेच 27 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर यादरम्यान फ्रेंच ओपन स्पर्धा होणार आहे. दोन्ही स्पर्धांमधील कालावधी कमी आहे. यावर रफाएल नदालचे काका म्हणाले, टेनिसचे कॅलेण्डर समजण्यापलीकडे आहे. प्रदीर्घ काळ टेनिस खेळत असलेल्या खेळाडूंसाठी सलग स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही. त्यांच्या फिटनेसचा कस लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या