
बीड जिल्ह्यात मागील तीन दिवसात अकरा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले आहे. मंगळवारी बीड जिल्ह्यातील 67 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ते तपासल्यानंतर 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले. 3 जणांचे अहवाल अजून प्रलंबित आहेत. बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 20 मे म्हणजेच बधवार सकाळपर्यंत 19 झाली आहे. बीड जिल्ह्याबाहेरून आलेल्या लोकांमुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. गेवराई, माजलगाव आणि आष्टी तालुक्यातील अकरा रुग्ण बाधित आढळून आल्यानंतर प्रशासनाने दोन दिवसात 140 हून अधिक जणांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवले होते.



























































