भाजप आमदाराला कोरोनाची लागण, वाढदिवशी घेतली होती समर्थकांची भेट

2435

लातूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमून्य पवार आणि त्यांचा मुलगा परिक्षित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. लातूर जिल्ह्यात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अभिमन्यू पवार यांचा नुकताच 1 जुलै रोजी वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अनेक जण भेटले, अनेकांनी त्यांचा सत्कार केला. मागील चार पाच दिवसापासून त्यांना हलकासा ताप येत होता. त्यामुळे आमदार आणि त्यांच्या मुलाने कोरोनाची चाचणी करून घेतली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली. मागील चार पाच दिवसांमध्ये जे आमदारांच्या संपर्कात आलेले आहेत त्या सर्वांनी स्वतःला होऊन होम क्वारंटाईन करून घ्यावे असे आवाहन आमदारांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या