कोरोना व्हायरसचा मिरची निर्यातीला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनकडून हिंदुस्थानी मिरची आयात बंद झाल्यामुळे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथील शेतकऱयांपुढे मोठी समस्या निर्माण झाली असल्याचा प्रश्न काँग्रेस नेते के.व्ही.पी. रामचंद्र राव यांनी गुरुवारी राज्यसभेत उपस्थित केला. राज्यसभेतील शून्य प्रहरात हा प्रश्न उपस्थित करताना राव पुढे म्हणाले की, हिंदुस्थान वर्षभरात किमान 5 हजार कोटींची मिरची चीनला निर्यात करत असतो.

हिंदुस्थानातील मिरची उत्पादनापैकी जवळपास 70 टक्के मिरची जहाजांद्वारे चीनला पाठवली जाते. ही बहुतांश मिरची आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून जाते. आता कोरोना व्हायरसच्या अचानक उद्भवलेल्या संकटामुळे मिरची उत्पादकांनी काय करायचे हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.