बुकिंग थांबल्याने विमान कंपन्यांचे शेअर्स घसरले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-airport

3 मेपर्यंत देशात लॉकडाऊन आहे, पण त्यानंतरच्या प्रवासाचेही बुकिंग सध्या घेऊ नका असे आदेश नागरी उड्डाण संचालनालयाने दिल्याने विमान कंपन्यांच्या शेअर्सना फटका बसला आहे. शेअर बाजारांमध्ये विमान कंपन्यांचे शेअर्स 5.5 टक्क्यांनी घसरले. इंटरग्लोब एव्हिएशनच्या शेअर्सचा भाव 5.47 टक्क्यांनी म्हणजेच प्रति शेअर 1010.65 रुपयांनी घसरला. तर स्पाईसजेटच्या शेअर्सचा भाव 2.77 टक्क्यांनी म्हणजेच प्रति शेअर 47.25 रुपयांनी घसरला. कोणत्याही विमान कंपनीने पुढील आदेश येईपर्यंत 3 मे नंतरचे तिकीट बुकिंग घेऊ नयेत असे परिपत्रक नागरी उड्डाण संचालनालयाने रविवारी जारी केली. सर्व घरगुती आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे बंद असून नागरी उड्डाण संचालनालयाने फक्त मालवाहू आणि विशेष विमानांनाच उड्डाणाची परवानगी दिली आहे.