कोरोनाग्रस्तांच्या संख्येत हिंदुस्थानने स्पेनलाही मागे टाकले,, मात्र ही आहे दिलासादायक बातमी

1430

हिंदुस्थानात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात मोठी वाढ झाली असून हा आकडा 2,45,670 वर पोहोचला आहे. त्यामुळे हिंदुस्थानने इटलीनंतर आता स्पेनलाही मागे टाकत पाचव्या स्थानावर उडी घेतली आहे. असे असले तरी या दोन्ही देशांच्या तुलनेत हिंदुस्थानातील मृत्यूदर फारच कमी आहे ही सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे.

शनिवारी हिंदुस्थानने इटलीला मागे टाकत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सहाव्या स्थानावर आला होता. मात्र या दोन्ही देशांच्या तुलनेत हिंदुस्थानातील बळींची संख्या कमी आहे. इटलीत आतापर्यंत 33,774 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये 27,134 जणांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानात हा आकडा 6642 वर पोहोचला आहे. हिंदुस्थानातील मृत्यूदर या दोन्ही देशांपेक्षा फार कमी आहे.

गेल्या आठवड्याभरात देशातील दररोजच्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 6500 वरून जवळपास दहा हजारापर्यंत पोहोचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या