
मध्य प्रदेशातील खंडवामध्ये एका लहान मुलाने मासे पकडायला गळ तलावात टाकला तर त्याच्या गळाला माशाऐवजी नोटांची थैली लागली. त्याने थैलीतील शक्य होतील तितके पैसे घेऊन धूम ठोकली. थैलीतील बऱ्याचशा नोटा सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तलावाच्या परिसरात विखुरल्या होत्या. या नोटांबाबतची बातमी जवळच्या आरूद गावात वाऱ्यासारखी पसरली. या नोटा कोणीतरी मुद्दाम टाकल्या असाव्यात असा संशय आल्याने ग्रामस्थांनी त्या नोटांना हातच लावला नाही. अखेर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नोटा निर्जंतूक करून ताब्यात घेतल्या.
नोटांमुळे पसरला कोरोना? ‘WHO’ सहित काय म्हणतायत ‘हे’ टॉप रिसर्च; वाचा..
खंडवा जिल्ह्यातील पंधाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एका तरुणाला मॉर्निंग वॉकला गेला असताना गाडीतून उतरलेल्या एका माणसाने तलावात काहीतरी फेकल्याचं दिसलं होतं. या तरुणाने त्यावेळी या घटनेकडे दुर्लक्ष केलं होतं. फिरून परत घराकडे जात असताना त्याला तळ्याभोवती गर्दी दिसली. चौकशी केली असतान त्याला कळालं की कोणीतरी तलावामध्ये पैसे फेकले आहेत.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात हिंदुस्थानची कामगिरी चांगली, WHOच्या शास्त्रज्ञाने केलं कौतुक
ज्या मुलाच्या गळाला थैली लागली होती, त्याचा शोध घेण्यात आला असून पोलिसांनी त्याच्याकडचे पैसेही परत मिळवले आहेत. पोलीस आता नोटा फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असून त्यांनी तरुणाला नोटा फेकताना पाहिलेल्या तरुणाची चौकशी केली आहे. ही घटना कोणीतरी मुद्दाम केली असावी आणि काहीतरी बरंवाईट करण्याचा हा प्रयत्न असावा अशा भीतीने आरूदचे रहिवासी घाबरले आहेत.




























































